डोडला डेअरी लिमिटेडची इनिशिअल पब्लिक ऑफरिंग १६ जून ते १८ जून २०२१ दरम्यान खुला होता. या ऑफरमध्ये इक्विटी शेअर ४२१ ते ४२८ रुपयांदरम्यान प्राइस बॅण्ड निश्चित करण्यात आला होता. ‘आयपीओ’तून ५२० कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

आज डोडला डेअरीचा शेअर इश्यू प्राईसपेक्षा २४ टक्के अधिक किमतीवर सूचीबद्ध झाला. ‘बीएसई’वर या शेअरची ५२८ रुपयाला नोंदणी झाली. तर ‘एनएसई’वर तो ५५० रुपयांवर खुला झाला. आज बीएसईवर डोडला डेअरीच्या शेअरने ५७४.८५ रुपयांची उच्चांकी मजल मारली. तब्बल १४६ रुपयांनी वाढ नोंदवली. यामुळे डोडला डेअरीचे गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झाला आहे.

अभिप्राय द्या!