आंध्र प्रदेशातील आरोग्य सेवा क्षेत्रातील हाॅस्पिटल साखळी असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेडच्या (केआयएमएस) शेअरने देखील आज सोमवारी भांडवली बाजारात दमदार प्रवेश केला.

कंपनीचा इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) १६ जून ते १८ जून २०२१ दरम्यान खुला होता. या योजनेसाठी प्रती इक्विटी शेअर ८१५ ते ८२५ रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला होता. आज प्रत्यक्षात कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईसच्या तुलनेत २२ टक्के अधिक दराने नोंदणी झाली. बीएसईवर ‘केआयएमएस’चा शेअर थेट १००८.९० रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यात २२.२९ टक्के वाढ नोंदवण्यात आली. राष्ट्रीय शेअर बाजारात तो १००९ रुपयांवर नोंद झाला. तिथं त्याने २२.३० टक्के जादा दराने नोंद केली.

अभिप्राय द्या!