आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने नवीन म्युच्युअल फंड योजना जाहीर केली आहे. invwsco india medium term duration fund योजना  २९ जून २०२१ पासून खुला झाला असून त्यात गुंतवणूकदारांना किमान एक हजारांपासून गुंतवणूक करता येईल. ही योजना १३ जुलै २०२१ पर्यंत खुली असेल,

ही एक ओपन एंडेड मध्यम कालावधीसाठीची डेट स्कीम आहे. फिक्स्ड इन्कम फंड अनेक प्रकारचे असतात. काही एक दिवसासाठी तर काही एक महिन्याचे असतात. तर काही योजना या एक किंवा दोन वर्षात पूर्ण होतात. इन्व्हेस्को मिडियम ड्युरेशन फंड तीन ते पाच वर्ष गुंतवणूक करेल. यातील निधी डेट आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जाणार असून त्यातून जास्तीत जास्त परताव्याचे उद्दिष्ट असेल. हा फंड बाजारातील रोकड तरलता, व्याजदर आणि पत पुरवठा या घटकांचा विचार करून तयार आला  आहे.

अभिप्राय द्या!