करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता केंद्र सरकारने अल्प बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या दुसऱ्या तिमाहीत ‘पीपीएफ’, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या समृद्धी योजनेसह इतर अल्प बचतीच्या योजनांचे व्याजदर पहिल्या तिमाही प्रमाणेच कायम राहणार आहेत. व्याजदर ‘जैसे थे’ ठेवल्याने कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

दुसऱ्या तिमाहीमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीसह (पीपीएफ) सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर पहिल्या तिमाहीप्रमाणेच ठेवले आहेत. दरम्यान, पहिल्या तिमाहीत सरकारने अल्प बचतीच्या विविध योजनांच्या व्याजदर कपात केली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून आज बुधवारी रात्री अल्प बचत योजनांचे दुसऱ्या तिमाहीतील व्याजदरांचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अभिप्राय द्या!