गृहकर्ज क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्सने शुक्रवारी गृहकर्ज दरात कपात केली आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर ६.६६ टक्के करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील, असे कंपने म्हटलं आहे. गृहकर्जाचा हा सर्वात कमी व्याजदर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
गृह कर्जाचा हा विशेष व्याजदर प्राप्त करण्यासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड ग्राह्य धरले जाणार आहे. सिबिलच्या आधारे कर्जदाराची पत क्षमता किती आहे त्यावरून हा विशेष व्याजदर दिला जाईल.