गेल्या महिन्यात सोशल मिडीयावर शेअर बाजारासंबंधी एक मेसेज बराच viral झाला होता.
त्यात *Asian paint, Pidilite, TATA motors या शेअर्समधील आपली गुंतवणूक ही दर चार वर्षांनी दुप्पट होत्ते. * आपणही आपली गुंतवणूक या समभागात करा असे त्या संदेशाचे स्वरूप होते.
प्रत्यक्षात वरील समभागांचा विचार करता गेल्या दहा / बारा वर्षात खरोखरच वरील सर्व कंपन्यांनी आपल्या शेअर होल्डर्सना संदेशात नमूद केल्यानुसार परतावा दिला आहे ही वस्तुस्थिती आहे.

आणि यादृष्टीने भारतीय शेअरबाजार, “आत्मनिर्भर भारत ’’ ही घोषणा आणि यावर्षीचा अर्थसंकल्प पाहता आपल्याला काही चांगले समभाग घेऊन दीर्घ कालावधीसाठी आपला पोर्टफोलिओ डेव्हलप करण्यासाठी कोणते समभाग चांगले आहेत त्यासंबधी काही माहिती द्यावी असे वाटत आहे.
१ ) *IRCTC *– या कंपनीचा आय.पी.ओ.listing च्या दिवशीच १००% वाढला व त्यानंतर आजतागायत बाजारातील चढ उताराकडे दुर्लक्ष करीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना साधारणत: तिप्पट परतावा दिला आहे.ही रेल्वे आरक्षण आणि त्यासंबधी सेवा देणारी भारतातील एकमेव कंपनी असून सध्या तरी या कंपनीला टक्कर देणारी कोणतीच कंपनी नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हा समभाग अजूनही आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पटीपेक्षा अधिक परतावा देऊ शकेल.
२) *Havells india ltd *-घरगुती वापरासाठी लागणारी चांगल्या दर्जाची विद्युत उपकरणे बनविणारी ही कंपनी असून भारतात कोणत्याही खेडेगावात सुद्धा याची दर्जेदार उपकरणे मिळतात.वाजवी किंमत, दर्जेदारपणा आणि वापरण्याची सुलभता ही या कंपनीच्या उत्पादनाची खासीयत आहे. त्यामुळे हा समभाग सुद्धा आपण घ्यावा असे वाटते.
३) *IDFCFirst Bank *:-कोव्हिड काळात या बँकेने खाते उघडण्यासाठी अत्यंत सुलभ प्रक्रीया सुरू केली असून कर्ज वितरण, वसूली यामध्ये सुद्धा पारदर्शकता ठेवली आहे.गेल्या वर्षी याच काळात हा शेअर रु.२०/- या अत्यल्प किंमतीस मिळत होता. आज त्याची किंमत तिप्पटीपेक्षा जास्त असून लवकरच हा शेअर तीन अंकी किंमत गाठेल हे निश्चित !
४) Praj industries – हा शेअर गेल्या सहा महिन्यात दुप्पटीपेक्षा जास्त वाढला असून केंद सरकारच्या पेट्रोल संबंधीच्या धोरणांचा या कंपनीला चांगलाच फायदा होणार हे निश्चित आहे.
५) अशाच स्वरूपाच्या चांगल्या परतावा देऊ शकणा-या काही कंपन्याची नावे नमूद करून हा भविष्यवाणीचा विषय मी इथेच थांबवितो. डीमार्ट , मेरिको, रॅलिज, अशोक लेलॅंड, आय आर बी, व्होल्टास,सिप्ला याही कंपन्या वर नमूद केल्यानुसार चांगला परतावा देऊ शकतात.
मात्र गुंतवणूक करताना बाजाराची स्थिती आणि आपली risk profile पाहूनच आपण गुंतवणुकीचा निर्णय घ्याल याची मी खात्री बाळगतो.
Happy Investing
प्रदीप जोशी
9422429103

अभिप्राय द्या!