देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाच्या माध्यमातून अमेरीका, जपान, हाँगकाँग यांसारख्या विभिन्न मोठ्या बाजारात गुंतवणूक करता येईल. हा फंड तेथील बाजारांत आधीपासूनच उपस्थित फंडांमध्ये गुंतवणूक करतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाचा पोर्टफोलिओ पाहिल्यास याच्या एकूण गुंतवणुकीपैकी २६ टक्के गुंतवणूक ही अमेरिकी ब्लूचिप इक्विटी फंडात आहे. तर निप्पोन इंडिया ईटीएफ हाँगकाँगमध्ये २५.४ टक्के, फ्रँकलिन एशियन इक्विटी फंडात २१.५ टक्के, निप्पोन जपान इक्विटी फंडात २०.९ टक्के गुंतवणूक आहे.

अशाप्रकारच्या गुंतवणुकीद्वारे चांगला लाभ मिळतो. या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाने २२.८३ टक्के चक्रवृद्धी व्याज (सीजीएआर) दराने परतावा दिला आहे. याचा अर्थ एखाद्या गुंतणूकदाराने ऑक्टोबर २०१९ मध्ये या फंडात १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर मे २०२१ मध्ये ती रक्कम १४,०३७ रुपये झाली असेल. हा फंड ऑक्टोबर २०१९ रोजी लॉन्च करण्यात आला होता.

अभिप्राय द्या!