इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’ ८०० कोटींचा आयपीओ २३ जून २०२१ ते २५ जून २०२१ दरम्यान खुला झाला होता. यासाठी कंपनीने प्रती इक्विटी शेअर २९० ते २९६ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ५० शेअरसाठी बोली लावण्याची अट होती.

कंपनीचा आयपीओ २९ पटीने सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा राखीव कोटा ११.३ पटीने सबस्क्राईब झाला होता. त्यामुळे शेअरची नोंदणी धमाकेदार होणार अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती.अपेक्षेनुसार आज सोमवारी ‘इंडिया पेस्टिसाइड्स’चा शेअर आज बीएसईवर ३६० रुपयांवर सूचिबद्ध झाला. आयपीओसाठी २९६ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यातुलनेत तो २१.६२ टक्के वाढीव किमतीवर सूचिबद्ध झाला. एका शेअरमागे गुंतवणूककारांना ६४ रुपयांचा फायदा मिळाला. या दमदार एंट्रीनं कंपनीचे बाजार भांडवल ४१०० कोटींपर्यंत वाढलं आहे.

अभिप्राय द्या!