भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आज मंगळवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये १५० अंकांची वाढ झाली असून सेन्सेक्स ५३००० अंकांवर गेला आहे. निफ्टीमध्ये ५० अंकांची वाढ झाली असून तो १५८८० अंकापर्यंत गेला आहे.

मात्र बाजार बंद होताना थोडी मूनफा वसूली झाली आणि निफ्टि 16 अंकांच्या घासारणीसह 15818 ल बंद झाला आहे !!

सोमवारी सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला होता. वित्तीय सेवा, बँका, स्थावर मालमत्ता, ऑटो या शेअरमध्ये वाढ झाली होती. आज सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी १५ शेअर तेजीत आहे. ज्यात एचडीएफसी बँक, बजाज फ्यानन्स, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एल अँड टी, टायटन, बजाज ऑटो, एचडीएफसी, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस या शेअरमध्ये आज तेजी आहे. तर दुसऱ्या बाजुला सन फार्मा, एसबीआय, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी, एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, टेक महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

अभिप्राय द्या!