आय.आय.एफ.एल. होम फायनान्स या कंपनीने नॉन कनव्हरटेबल (NCD) डिबेंचर विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.

मंगळवार दिनांक ६ जुलै २०२१ पासून २८ जुलै २०२१ पर्यंत याची आपण खरेदी करू शकतो. या एका NCD ची किमंत रु. १००० असून किमान १० NCD आपणाला खरेदी करणे आवश्यक आहे.
क्रिसिल या कंपनीने या बॉंडसाठी I I F L ला AA रेटिंग दिले आहे. आणि या बॉंडची मँनेजमेंट एडलवाइज तर्फे होणार आहेत.

ज्यांचे demat अकाऊंट आहे अशा सर्व पात्र ग्राहकांना या N.C.D. ची खरेदी करता येऊ शकते. या गुंतवणूकीतून मासिक किवां वार्षिक १०% पेक्षा जास्त परतावा प्राप्त होऊ शकतो. ही कंपनी NCD द्वारे प्राप्त होणा-या निधीचा वापर किरकोळ स्वरूपातील गृहखरेदीसाठी लोकांना कर्जाऊ रक्कम देण्यामध्ये करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात या होम फायनान्स डिव्हिजनने १,४१,००० पेक्षा जास्त ग्राहकांना गृहखरेदीसाठी कर्जाऊ रक्कम दिली आहे.
यामध्ये आपल्याला गुंतवणूक करावयाची असल्यास demat खाते असणे गरजेचे आहे आणि यासंबधी अधिक महिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती.

अभिप्राय द्या!