परफॉर्मन्स केमिकल्स (म्हणजे एमईएचक्‍यू, बीएचए आणि एपी), फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्स (म्हणजे ग्‍वायाकोल आणि डीसीसी) आणि एफएमसीजी कंपन्यांना लागणारी केमिकल्स (म्हणजे ४-एमएपी आणि अॅनिसोल) अशा कार्यशीलतेच्या दृष्टीने महत्त्वाची स्पेश्यालिटी केमिकल्स उत्पादित करणारी कंपनी  cleane science and tech ७ जुलै २०२१ रोजी आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी खुली झाली आहे.

या ऑफरसाठीचा प्राइस बँण्ड प्रती इक्विटी शेअर ८८० ते ९०० या दरम्यान निश्चित कऱण्यात आला आहे. किमान १६ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर १६ च्या पटीतील संख्येइतक्या इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. या योजनेत ९ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे.

अभिप्राय द्या!