इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने नवीन योजना ‘इन्व्हेस्को मीडियम डय़ुरेशन फंड’ या नावाने २९ जून २०२१ पासून खुली झाली असून त्यात गुंतवणूकदारांना किमान एक हजारांपासून गुंतवणूक करता येईल. ही योजना १३ जुलै २०२१ पर्यंत गुंतवणुकीस खुली असेल. या योजनेत ‘एसआयपी’च्या माध्यमातून दरमहा किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.

ही एक गुंतवणुकीस कायम खुली (ओपन एंडेड) मध्यम कालावधीची रोखेसंलग्न योजना आहे. स्थिर उत्पन्न योजना अनेक प्रकारच्या असतात. काही एक दिवसांसाठी तर काही एक महिन्याचे असतात. तर काही योजना या एक किंवा दोन वर्षांत पूर्ण होतात.

इन्व्हेस्को मीडियम डय़ुरेशन फंड तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करेल. यातील निधी डेट आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जाणार असून त्यातून जास्तीत जास्त परताव्याचे उद्दिष्ट असेल.

अभिप्राय द्या!