पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने पीजीआयएम इंडिया स्मॉल कॅप हा नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणला आहे. नवीन फंड येत्या ९ जुलैला गुंतवणूकीस खुला होणार असून २३ जुलै २०२१ ला बंद होणार आहे. या फंडासाठी निफ्टी स्मॉल कॅप १०० टोटल रिटर्न हा आधारभूत निर्देशांक राहणार आहे.

स्मॉल कॅप गटातील समभाग आणि तत्सम साधनांमध्ये गुंतवणूक करत दीर्घ मुदतीत भांडवलाची वृध्दी हे या फंडाच्या गुंतवणुकीचे उद्दीष्ट राहणार आहे. आपल्या एकूण निधीपैकी ६५ टक्के निधी हा स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतविला जाणार आहे. अव्वल दर्जाच्या पोर्टफोलिओची उभारणी करताना अन्य समभाग आणि तत्सम साधनांच्या वाढीचा फायदा उठविण्यासाठी हा फंड त्यांच्यातही गुंतवणूक करु शकतो. या फंडाचे व्यवस्थापन अनिरुध्द नाहा ( समभाग), कुमारेश रामकृष्णन ( रोखे आणि चलन बाजार गुंतवणूक ) आणि रवी आदुकिया ( विदेशी गुंतवणूक ) हे तिघे सांभाळणार आहेत.

अभिप्राय द्या!