पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचा स्मॉल कॅप फंडाची प्राथमिक विक्री २३ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. फंडाच्या गुंतवणुकीचे उद्दीष्ट मुख्यत: स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ मिळविणे असल्याने स्मॉल कॅप गटात उपलब्ध असलेल्या संधींचा उपयोग करणे फंडाचा उद्देश आहे.

फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ६५ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांत करेल. इष्टतम पोर्टफोलिओ साध्य करण्यासाठी हा फंड इतर समभाग आणि समभाग साधनांचा वापर करेल.

पीजीआयएम इंडियाने उपलब्ध करून दिलेले आमचे आंतरराष्ट्रीय फंड देखील चागला परतावा देत आहेत.

अभिप्राय द्या!