मागील काही सत्रात रेकॉर्ड पातळीवर गेलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज नफावसुली दिसून आली आहे. सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुली करून कमाई केली. आज बाजार बंद होताना सेन्सेक्स १८ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ५३१४० अंकावर स्थिरावला. nifty १५९२३ अंकावर स्थिर राहिला.

आज एचडीएफसी एएमसी, एल अँड टी फायनान्स होल्डींग, जस्ट डायल, डिजिटल मीडिया, डेन नेटवर्क्स या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले.

आज बाजार सुरू होताच सेन्सेक्सने ७० अंकाची वाढ नोंदवली होती. निफ्टी १५९५० अंकांपर्यंत गेला होता. सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २३ शेअर तेजीत होते. तर ७ शेअर मध्ये घसरण झाली. आयटीसी, एचसीएल टेक, एचडीएफसी, एशियन पेंट, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, डॉ. रेड्डी लॅब, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरमध्ये वाढ झाली.

बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, आयसीआएसीआय बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा हे शेअर घसरले.तिमाही निकालाचे पडसाद आज विप्रोच्या शेअरवर उमटले. विप्रोचा शेअर २ टक्क्यांनी वधारला होता. त्याचबरोबर अँजल ब्रोकिंगच्या शेअरमध्ये आज १२ टक्के वाढ झाली. कंपनीला ११७.८५ कोटीचा नफा मिळाला. त्यात २१० टक्के वाढ झाली. त्यामुळे आज बाजारात अँजल ब्रोकिंगच्या शेअरला प्रचंड मागणी दिसून आली.

अभिप्राय द्या!