भांडवली बाजार सध्या विक्रमी पातळीवर आहे. अर्थचक्र हळूहळू वेग घेत असले तरी सध्याचे भांडवली बाजाराचे मूल्यांकन हे मार्च २०२०च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात गुंतवणुकीचा विचार करीत असलेल्या परंतु बाजाराच्या चढे मूल्यांकन पाहता साशंक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, फ्लेक्झी कॅप हा एक सर्वोत्तम पर्याय ठरेल.
फ्लेक्झी कॅपमध्ये लार्ज कॅपपासून मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारच्या समभागांचे मिश्रण असते. त्याचबरोबर ‘सेबी’च्या वर्गीकरणानुसार ही अधिक लवचीक समभागसंलग्न फंडांची श्रेणी आहे. या श्रेणीत नुकतीच आयसीआयसीआय प्रूडेन्शिअलने एका योजना सादर केली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
इक्विटी म्युच्युअल फंडाच्या श्रेणीत फ्लेक्झी कॅप सर्वात आकर्षक योजना आहे. या योजनेत वेगवेगळ्या बाजार मूल्यांकनानुसार गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. पोर्टफोलिओत लार्ज कॅपमधील गुंतवणूक संकटाच्या काळात सुरक्षा प्रदान करते, तर मिड आणि स्मॉल कॅपमधील गुंतवणूक दीर्घकाळात चांगला परतावा देण्यास फायदेशीर ठरतात. अनुकूल लाभ-जोखीम संतुलन हवे असलेल्या गुंतवणूकदारांना हा फंड प्रकार गुंतवणुकीचा चांगला मिळवून देतो.