बँकांकडे रोकड तरलता वाढल्याने अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्था (एनबीएसीफसी) आकर्षक व्याजदरात कर्ज देत आहेत. यात ग्राहकाचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर त्याचा तुम्हाला कर्ज घेताना फायदा होतो. यात काही बँका आणि एनबीएफसी कंपन्या १० टक्क्याहून कमी व्याजदराने कर्ज देत आहेत.

सध्या तीन बड्या बँका या personal loan १० टक्क्याहून कमी दराने देत आहेत. ज्यात भारतीय स्टेट बँक, सिटी बँक आणि एचएसबीसी बँक या तीन बँकांचा वैयक्तिक कर्ज दर १० टक्क्यांहून कमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा पर्सनल लोनचा व्याजदर ९.६० टक्के ते १३.८५ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

बँक ऑफ बडोदाचा व्याजदर १० टक्के ते १५.६० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

अभिप्राय द्या!