जर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एसटीपी म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्स्फर प्लानमध्ये गुंतवणूक करीत असाल तर तुम्ही याकरिता बुस्टर एसटीपीचा देखील विचार करायला हवा. परताव्याच्या आकडेवारीकडे पाहिल्यास असे दिसते की ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर परताव्यात वाढ करण्यास मदत करत असल्याचे दिसून आले आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने बुस्टर एसटीपी लॉन्च केला आहे. याची परताव्याची आकडेवारी पाहिल्यास आढळते की एखाद्याने जानेवारी २०१९ मध्ये बुस्टर एसटीपीमध्ये १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर २१ जुलै २०२१ रोजी ही रक्कम २१,४१,९९७ रुपये झाली असती. म्हणजेच वार्षिक परतावा सरासरी (सीएजीआर) दर २५.१% राहिला आहे.

समान गुंतवणूक दीर्घ कालावधीकरिता सामान्य एसटीपीमध्ये केली असेल तर त्याचे मूल्य या कालावधीत १४.१९% परताव्यासह १७,१६,४८८ रुपये झाले असते. तर अल्प कालावधीकरिता सामान्य एसटीपीमध्ये १२ लाखांच्या गुंतवणुकीचे मूल्य १५% सीएजीआर दराने १७,१२,९७८ रुपये झाले असते.

बुस्टर एसटीपी योजनेद्वारे महागड्या बाजारात एखादी छोटी रक्कमदेखील गुंतवता येऊ शकते. याउलट बाजारातील मूल्यांकन कमी असताना गुंतवणूक वाढवली पाहिजे. उदाहरणार्थ जर बेस इन्स्टॉलमेंट रक्कम १ लाख रुपये असेल तर ती १ पट ते ५ पट दरम्यान गुंतवली पाहिजे. म्हणजे १० हजार रुपये ते ५ लाख रुपये गुंतवले पाहिजेत. हे बाजाराच्या मूल्यांकनावर आधारित असावे.

अभिप्राय द्या!