सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील V मालिका आज सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून खुली झाली आहे. यासाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७९० रुपये भाव निश्चित केला आहे. याआधी जुलै महिन्यातील गोल्ड बॉण्डच्या तुलनेत १७ रुपयांनी कमी आहे.
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ९ ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खुली राहणार आहे. ‘आरबीआय’ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोखे खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४७९० रुपये प्रती ग्रॅम असेल. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत जाहीर केली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४७४० रुपये प्रती ग्रॅम असेल, असे सरकारने म्हटलं आहे