लवकरच भांडवली बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील एका मिनिरत्न कंपनीचा आयपीओ धडकणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल सीड कॉर्पोरेशनमधील (NSC) अंशतः हिस्सा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एनएससी’ मधील प्रारंभिक समभाग विक्री योजनेची तयारी सरकारने सुरु केली आहे.

नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकारची १०० टक्के मालकी आहे. यातील २५ टक्के हिस्सा आयपीओच्या माध्यमातून विक्री केला जाणार आहे. यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून आयपीओ नियोजनासाठी व्यापारी बँकाकडून प्रस्तव मागवण्यात आले आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल सीड कॉर्पोरेशनला भांडवली बाजारात सूचीबद्ध केले जाणार आहे

 

अभिप्राय द्या!