खासगी क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने मंगळवारी अंशत: शिथिल केले. त्यामुळे आठ महिने सुरू राहिलेल्या बंदीनंतर बँकेला पुन्हा नवीन क्रेडिट कार्ड वितरण शक्य होणार आहे. तथापि कोणतीही नवीन डिजिटल सुविधा सुरू करण्यावरील बँकेवरील निर्बंध मात्र तूर्त लागू राहणार आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे अनेकवार सेवा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचा दंड म्हणून रिझर्व्ह बँकेने बंदीचे हे अभूतपूर्व पाऊल डिसेंबर २०२० मध्ये टाकले होते. आता ही बंदी उठविण्याचा निर्णय घेताना, माहिती-तंत्रज्ञानविषयक परीक्षण पूर्ण केले गेले आहे, असे एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचे लेखी पत्रही रिझर्व्ह बँकेने मागितले असल्याचे समजते.

 

Leave a Reply