* सोन्या संबंधी थोडेसे *
भारतीय लोकांना सोने खरेदीमध्ये पारंपारिक दृष्टीने आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने सुध्दा खूप स्वारस्य असते. अजूनही सोन्यातील गुंतवणूक ही secure स्वरूपाची आहे अशी मानली जाते. तसेच सोन्याचे वाढते दर लक्षात घेता सोन्याचा * परतावा * हा मोठा आहे असेही समजले जाते. आपल्या देशात केवळ सोने तारण घेऊन कर्ज व्यवहार करणा-या अनेक संस्था मोठया झाल्याचे दिसून येत आहे .
या सोन्यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे :
1) सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सोने मिळते.
२) भारतात कोलार येथे सोन्याची मोठी खाण आहे पण सध्या 2003 पासून ही खाण बंद आहे.
३) जागतिक स्तरावर लंडन बुलीयन मार्केट मध्ये सकाळी 10:30 व दुपारी 3 वाजता सोन्याची दररोजची किंमत जाहीर करण्यात येते आणि सर्व क्रियेला जगाची मान्यता आहे.
४) भारतात झारखंड मध्ये हट्टी येथे सोने सापडते.
5) त्रिवेंद्रममधील पद्मनाभ मंदिर मध्ये सोन्याचा सर्वात जास्त साठा आहे.
6) तिरुपती बालाजीमध्ये 2780 किलोग्रॅम सोन्याचा साठा आहे.
7) भारत सरकारकडे 6 अब्ज डॉलरचे सोने असून ते नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या गोडाऊनमध्ये पाठविण्यात आलेले आहे.
असे हे सोने दागिन्यांच्या रूपात खरेदी करण्यासाठी भारतीय लोकांची कोणत्याही सणावारादिवशी झुंबड उडते.
पण दागिन्यांच्या रूपातील सोन्याचा दर्जा हा कमी दर्जाचा असल्याने विक्री करताना त्यातुन आपल्याला प्रत्यक्ष कमी परतावा मिळतो .
आणि या दृष्टीने भारत सरकारने काढलेले *सुवर्णरोखे घेणे * केव्हाही चांगले Souvergin Gold Bond
(S G B)
याद्वारे आपण 1 ग्रॅम पासून 4 किलो ग्रॅम पर्यंत सोने खरेदी करू शकतो. हे सोने आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ठेवले जाते व त्याची आपण आपल्या गरजेनुसार आवश्यकता असल्यास केव्हाही विक्री करू शकतो.
विक्री करताना सोन्याचा जो बाजारभाव असेल त्या दराने प्राप्त होणारी रक्कम आपल्या बँक अकाऊंट मध्ये तिस-या दिवशी जमा होऊ शकते.
अशा स्वरूपातील घेतलेले सोने ठेवण्यासाठी लॉकरची गरज भासत नाही. आणि हे सोने मूर्त स्वरूपात नसल्याने त्याची चोरीही होण्याची भीती नसते !तरी यापुढे आपण सर्वांनी सोने खरेदी करताना *दागिने खरेदी न करता सुवर्ण रोखे खरेदी करणे उत्तम आहे. *
आणि याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
प्रदीप जोशी
9422429103

अभिप्राय द्या!