रस्ते विकास क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणार्‍या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.च्या देशातील पहिल्या पायाभूत गुंतवणूक विश्वस्त कोशाच्या म्हणजेच इन्व्हिट फंडाच्या उभारणीनंतर आज (बुधवार) ‘इंडिया ग्रिड ट्रस्ट’ची प्रारंभिक खुली विक्री सुरू होणार आहे. वीज पारेषणाचे जाळे असलेल्या इंडिया ग्रिड ट्रस्ट या विक्रीतून रु.2250 कोटींचे भांडवल उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे.

केंद्र सरकारने 2015 च्या अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच इनव्हिटच्या माध्यमातून निधी उभारण्यास परवानगी दिली होती. आता ‘इंडिया ग्रिड’साठी 98 ते 100 रुपये किंमतपट्टा  आहे.

‘इंडिया ग्रिड’ इन्व्हिट फंडात गुंतवणूक कशी करता येते?
आपण ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो त्याचप्रमाणे रिटेल गुंतवणूकदारांना इन्व्हिट फंडामध्ये गुंतवणूक करता येईल.
या इन्व्हिट फंडासाठी रु.100. दराने बोली लावता येणार आहे. मात्र किमान दहा हजार युनिट्ससाठी (किमान गुंतवणूक रु.10 लाख 20 हजार) अर्ज करावा लागेल आणि त्यापुढे पाच हजार युनिट्सच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. इन्व्हिट फंडातील युनिट्स मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी करण्यात येतील. त्यामुळे शेअर बाजारातील शेअर्सप्रमाणे त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील.

 

अभिप्राय द्या!

Close Menu