विविध संस्थांचे जीडीपीविषयक सकारात्मक अंदाज आणि करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेची रेकॉर्डब्रेक कामगिरी या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भांडवली बाजारात जोरदार तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स ५५० अंकांनी वधारला असून निफ्टीत १७९ अंकाची वाढ झाली आहे.

आज बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३३० अंकाची झेप घेतली होती तर निगती १६८०० अंकाच्या नव्या विक्रमी पातळीवर गेला होता. सध्या सेन्सेक्स ६२० अंकांनी वधारला असून तो ५६७४५ अंकावर गेला आहे. आतापर्यंतची सेन्सेक्सची विक्रमी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८९ अंकांनी वधारला असून तो १६८९४ अंकावर ट्रेड करत आहे.

आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, ऑटो, स्थावर मालमत्ता, एफएमसीजी , आयटी सेवा या क्षेत्रात मोठी खरेदी दिसून आली आहे. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २९ शेअर तेजीत आहेत तर पॉवरग्रीड या एकमेव शेअरमध्ये घसरण झाली.

अभिप्राय द्या!