गोल्ड बॉण्ड २०२१-२२ मधील VI मालिका सोमवार ३० ऑगस्ट २०२१ पासून खुली होणार आहे. या योजनेसाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७३२ रुपये भाव निश्चित केला आहे. याआधीच्या गोल्ड बॉण्ड योजनेच्या तुलनेत सोने दर ५८ रुपयांनी कमी आहे. डिजिटल माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४६८२ रुपये प्रती ग्रॅम असेल.

‘आरबीआय’ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोखे खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४७३२ रुपये प्रती ग्रॅम असेल. यापूर्वीच्या बाॅण्ड योजनेनुसार सोनं ५८ रुपयांनी स्वस्त आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या योजनेत प्रती ग्रॅम दर ४७९० रुपये होता.

नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरु केली होती. रिझर्व्ह बँकेने २०२०-२१ या वर्षात गोल्ड बॉन्ड योजनेचे विक्री १२ टप्पे जारी केले. ज्यातून तब्बल ३२.३५ टन सोने विक्री झाले आहे. ज्यात सरकारला १६०४९ कोटींचा महसूल मिळाला होता.

अभिप्राय द्या!