गुंतवणूक जर दीर्घ कालावधीकरिता असेल तर त्याचा चांगला फायदा होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या १७ वर्षात दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आज १.०८ कोटी रुपये झाली असेल. म्हणजेच वार्षिक १७.५ टक्के सीएजीआर दराने या योजनेत परतावा मिळाला आहे. सीएजीआर म्हणजे चक्रवृद्धी व्याज दराने मिळणारा परतावा.

एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.

ही सुविधा म्युच्युअल फंडमध्ये असते. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेची सुरुवात ऑगस्ट २००४ मध्ये करण्यात आली होती. हा म्युच्युअल फंड उद्योगातील जुन्या व्हॅल्यू फंडपैकी एक आहे ज्याने १७ वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेत गुंतवणूकदारांची रक्कम म्हणजेच व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयुएम) २१,१९५ करोड रुपये झाली आहे.

अभिप्राय द्या!