स्वातंत्र दिनाच्या मुहूर्तावर आर्थिक स्वातंत्र्यासंबंधी * *“धनलाभमध्ये ” * दिलेला लेख पाहून माझे एक मित्र त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी कार्यालयात आले. त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे आजपर्यंत त्यांनी स्वत: व आपल्या पत्नीच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने *प्रीमियम भरणे आवश्यक असलेल्या जीवन विमा (LIC) * च्या पॉलिसी घेतल्या आहेत असे संगितले.
पण रिस्कफॅक्टर सोडता त्याद्वारे मिळणारा परतावा हा
Infletion * सुद्धा पार पडू शकत नाही हे त्यांच्याही ध्यानी आले नाही.

आणि त्या दृष्टीने त्यांना SIP (Systematic Investment Plan ), HIP (Health Insurance Plan), TIP (Term Insurance Plan) या संबधी मी माहिती दिली.

आज ही माहिती मी तुम्हा सर्वांना या लेखाद्वारे थोडक्यात सांगणार आहे.

एखादे आर्थिक उद्दीष्ट गाठण्यासाठी नियमितपणे म्युच्युअल फंडात दरमहा करावयाच्या गुंतवणूकीला आपण SIP म्हणतो. चक्रवाढव्याजदराचा * फायदा घेण्यासाठी गुंतवणूक मधेच थांबविणे किंवा SIP तील *मिळकत मोडणे * हे घातक असते.

पण काही वेळा दुर्धर आजार, अपघात किंवा तश्या स्वरूपाचे आर्थिक खर्च उद्भवल्यास SIP तील रक्कम बरेच लोक काढतात आणि मग त्यापासून मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित राहतात.

अशा दुर्धर आजारासाठी अथवा अचानक उद्भवलेल्या आजारासाठी * आपल्या पूर्ण कुटुंबाची Health Insurance असलेली मेडिक्लेम पॉलिसी असणे खूप हितावह असते. या पॉलिसीमधून मिळवत्या व्यक्तीचे कुटुंब केव्हाही आजारी पडल्यास त्याचा किमान 90% पर्यंतचा खर्च आपल्याला मिळू शकतो आणि अशा स्वरूपाची मेडिक्लेम पॉलिसि आपण मिळवते झाल्या झाल्या घेतल्यास प्रीमियम कमी बसून जवळजवळ सर्वच प्रकारच्या आजाराला संपूर्ण कव्हर प्राप्त होते, आणि यालाच HIP (Health Insurance plan) असे म्हटले जाते.

मिळवत्या व्यक्तीला एखादा अपघात झाल्यास त्याच्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मुदतीचा विमा म्हणजे Term insurance plan * असणे आवश्यक ठरते. Term Plan मध्ये प्रीमियम फारच कमी द्यावा लागतो आणि साधारणपणे 50 लक्ष ते 1 कोटी रुपये रक्कमेचे कव्हर सहजरीत्या मिळते. याद्वारे आपल्यावरील जबाबदाऱ्या व आपल्या कुटुंबाचे स्थैर्य यांची काळजी राहत नाही तसेच SIP द्वारे सुरू असलेली गुंतवणूकसुध्दा *अवेळी मोडण्याची पाळी * आपल्यावर येत नाही. फक्त जो प्रीमियम भरणार आहोत त्यापायी आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा *मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाही. *
पण या तीन्ही प्रकारे आपण आपले
आर्थिक स्थैर्य गाठण्याचे उद्धिष्ट * सहजपणे पार पाडू शकतो.

SIP तील गुंतवणूकिला HIP चे प्रोटेक्शन आणि या दोन्हीसाठी TIP (Term Insurance Plan) चे कव्हर ही * त्रिसूत्री * कोणत्याही मिळवत्या व्यक्तीने सुरवातीपासूनच अमलात आणल्यास कोविड सारख्या महामारीला आपल्यापासून दूर घालवणे सहज शक्य आहे. आणि यासाठी SIP, HIP, आणि TIP यांचा एकत्रित विचार सर्वांनी करणे अत्यावश्यक आहे.
प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!