आता चालू असलेली तेजीच्या माध्यमातून जी काही नवनवीन शिखर गाठली जातात ती तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेयांमुळेच. आता या प्रमेयांचीदेखील वरची लक्ष्य सेन्सेक्सवर ५८,००० ते ५९,५०० आणि निफ्टीवर १७,३०० ते १७,७०० साध्य होताना दिसतील. त्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे. या ऐतिहासिक उच्चांकावरून निर्देशांक सेन्सेक्स ५३,५०० ते ५१,८०० आणि निफ्टी निर्देशांक १६,००० ते १५,५०० पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्याच्या ऐतिहासिक उच्चांकाला अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी, नफ्यातील अर्धे समभाग विकायला हवेत.

नफ्यासाठी समभाग विकण्याच्या दृष्टीने, त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी पडतील

१.आपल्याकडे असलेल्या चांगल्या प्रतीच्या समभागांची जी आपण विक्री करणार आहोत ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, किंबहुना ही नफारूपी विक्री आहे. गुणवत्तेचे मापदंड जोपासणाऱ्या कंपन्या या कधीच वाईट नसतात, असते ती वाईट वेळ  आपअसते. त्यामुळेल्याकडे असलेल्या कंपन्यांचे अर्धे समभाग तेजीतविकले की मंदीत तेच समभाग पुन्हा स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात. हे सांगण्यामागे मुख्य उद्देश हा गुंतवणूक धारणा व मर्यादित भांडवलाचा आहे. जोपर्यंत मध्यमवर्गीय गुंतवणू

आपल्याच समभागात येईल का? याची खात्री नाही व त्यात मंदीच्या दाहकतेत समभागाचे भाव अध्र्यावर आले की आर्थिक फटका तर बसतोच, पण त्याहून कैक पटींनी अधिक असा मानसिक धक्का बसतो.

२. अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांकडून नफ्यातील समभागांमध्ये नफावसुलीसाठी विक्री झटकन होत नाही. किंबहुना नफ्यातील समभाग हातातून सुटत नाहीत. अशासमयी हात कंप पावतो याचे एकमेव कारण म्हणजे, नफ्यातील समभाग विकले व नंतर भाव आणखी वाढले तर? येथे एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना नेहमीच नफ्यातील – तोटय़ाला (नोशनल लॉस) सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, समभाग १०० रुपयांना खरेदी करून १५० ला विकल्यानंतर त्याच समभागाची किंमत २०० रुपये होते. पण येथे निदान ५० टक्के परतावा तरी मिळतोय! आज आपण जो समभाग भविष्यकालीन उदयोन्मुख समभाग म्हणून विचार करतो, पण भविष्यातील व्यापारउदीम चक्रात तसे न घडल्यास? फार दूरची गोष्ट नाही अवघ्या तीन वर्षांपूर्वीच्या घटना आठवून पाहा. २०१८ सालच्या तेजीत भविष्यकालीन उदयोन्मुख कंपन्यांची यादी सांगा, तर त्यात हमखास डीएचएफएल ६८० रुपये, येस बँक ४०० रुपये, वक्रांगी सॉफ्टवेअर ५०० रुपये, पी.सी.ज्वेलर्स ६०० रुपये अशी नावे त्या वेळेला, त्या किमतीला सुचविली जायची. अवघ्या तीन वर्षांच्या आत आताच्या घडीला या सर्व समभागांचे भाव १० ते ५० रुपयांच्या आसपास आहेत. तेव्हा या व्यवस्थेत समभाग १०० रुपयाला घेऊन १५० रुपयाला विकला व त्यानंतर समभागाचा भाव २०० रुपये झाला, या न दिसू शकलेल्या नफ्यातील तोटय़ाचे दु:ख जास्त की मुद्दल गमवली जाण्याच्या मनस्तापापेक्षा चांगलेच, याचा विचार होण्याची आज गरज आहे.

अभिप्राय द्या!