* शेअर बाजार समज आणि गैरसमज *
भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता, भारतामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक ही फारच कमी आहे.
गेल्या वर्षभरात 67 लाखापेक्षा जास्त नवीन डिमॅट खाती उघडली गेली असली तरी, एकंदारीत “3 ते साडे 3 कोटींच्या ” संख्येची * डिमॅट व ट्रेडींग * अकाऊंट सध्या कार्यरत आहे.
आणि सध्या ट्रेडींग संबधीचे सर्व व्यवहार हे* ऑनलाईन * स्वरूपात असल्याने बाजारासंबंधी प्रचलित असलेले गैरसमज आणि वस्तुस्थिती यासंबंधी काही मुद्दे मी खाली सांगत आहे.
1.शेअर बाजारातील मिळालेला फायदा हा तिथेच सोडावा लागतो.
प्रत्यक्षात अशी स्थिती नाही, गेल्या वर्षभरात माझ्या पाहण्यात अनेकांनी शेअर बाजारातुन मिळालेला फायदा हा रिडीम करुन दुसरीकडे गुंतविला आहे . चांगल्या* फंडामेन्टल* असलेल्या कंपनीचे समभाग घेतल्यावर त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा होतोय ते पाहून त्यातील फायदा Encash करून शेअर बाजारातील गुंतवणूकीतून प्रत्यक्ष फायदा हाती पडू शकतो. मात्र ही “कार्यवाही* योग्य लक्ष देऊन करणे आवश्यक असते .
2. म्युच्युअल फंडामधून फायदा होतच नाही .
“बरेच लोक” बाजाराचे निर्देशांक जेव्हा वर असतात तेव्हाच म्युच्युअल फंडामध्ये *एकरक्कमी * गुंतवणूक करतात.
आणि नंतर काही कारणामुळे निर्देशकांची घसरण होते, अशावेळी ही गुंतवणूक करणारी मंडळी आपले नुकसान झाले म्हणून बाहेर पडतात पण हुशार व्यक्ती निर्देशांक घसरले असतानाच बाजारातील आपली गुंतवणूक वाढवितात व आपल्या नुकसानीवर मात करतात.
३. परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक – काढणे आणि वाढविणे.
भारतातील प्रसार माध्यमे – * जेव्हा बजार पडतो, तेव्हा परदेशी गुंतवणूकदारांनी ”गुंतवणूक काढली / गुंतवणूकीचा ओघ” आटला अश्या स्वरूपाच्या बातम्या देतात.
पण भारतीय बाजारंचे निर्देशांक किंबहुना भारतीय बाजार हा परदेशी गुंतवणूकीवर अवलंबून अजिबात नाही.
भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच वित्त संस्था आणि बँक यांची बाजारात फार मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री चालू असते आणि या गुंतवणूकीद्वारे किंवा निर्गुंतवणूकीद्वारे बाजाराचे निर्देशांक फेरबदल दर्शवित असतात.
त्यामुळे केवळ परदेशी गुंतवणूकीवर भारतीय शेअर बाजार अवलंबून नाही .बाजारात तात्पुरती पडझड होतच असते , पण दीर्घकालावधीचा विचार करता बाजाराचे मूल्य वाढलेले दिसत आहे .
4. शेअर बाजार हा एक सट्टा किंवा जुगार आहे .
सट्टा खेळताना pancard ,आधारकार्ड , बँकखाते ,चेक लागतो का? पण शेअर बाजारात डिमॅट खाते उघडायचे झाल्यास वरील सर्व कागद लागतात .
केलेल्या गुंतवणूकीतून मिळालेल्या फायदा – तोट्याचा हिशोब टॅक्स रिटर्न भरताना द्यावा लागतो. त्यामुळे शेअर बाजाराला सट्टा बजार म्हणणे हा सर्वात मोठा गैरसमज आहे.

५. अॅडव्हायझरी कंपनीचा सल्ला फायदेशीर असतो.
आपण डिमॅट खाते उघडले कि आपल्याला अनेक सल्लागार कंपन्यातर्फे आपला सल्ला ऐका आणि दिवसाला भरपूर पैसे कमवा असे संदेश येऊ लागतात पण असे संदेश घेऊन त्याद्वारे ट्रेडिंग करणे नुकसानकारक होऊ शकते.
त्यामुळे खरेदी करताना चांगल्या फंडामेंटलसचे कंपनीचे शेअर घेणे हितावह असते.
थोडक्यात कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता जे लोक शेअर बाजारात प्रवेश करतात त्या लोकांचे शेअर बाजारात नुकसान होण्याचा संभव अधिक असतो.
टिव्ही चॅनेल, बातम्या, टिप देणाऱ्या संस्था किंवा व्हाट्सपच्याद्वारे मिळणारे संदेश यावर बाजाराची चाल अवलंबून नसते हे ध्यानी घेऊन आपली गुंतवणूक योग्यरित्या करण्यासाठी सतत अभ्यासुवृत्ती बाळगणे मिळालेल्या माहितीचा तौलनीक अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊन गुंतवणूक करणे हे जास्त हितावह आहे.
या संबंधी अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
प्रदीप जोशी – ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!