गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ५८,३०५.०७

निफ्टी : १७,३६९.२५

आज आपण निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा प्रयत्न करूया. निफ्टी निर्देशांकाने आपल्या भोवती ३०० अंशांचा परीघ निर्माण केला आहे. जसे की… १६,९००-१७,२००-१७,५०० यात १७,२०० हा स्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असेल. या स्तरावर बारीक नजर ठेवून निफ्टीची पुढील वाटचाल रेखाटू या. आगामी दिवसांत येणाऱ्या हलक्याशा घसरणीत निफ्टी निर्देशांकावर १७,२०० चा स्तर राखला गेल्यास वरचे लक्ष्य हे १७,५००, १७,८००, १८,००० असेल. अन्यथा १७,२०० चा स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक १६,९०० पर्यंत खाली घसरू शकतो. निफ्टी निर्देशांक १६,९००-१६,८०० चा स्तर राखण्यास यशस्वी ठरल्यास तेजीचे अंतिम चरण सुरू होऊन निफ्टी निर्देशांकांचे वरचे लक्ष्य १७,५००, १७,८०० ते १८,००० असे असेल.

अभिप्राय द्या!