“कोटक म्युच्युअलफंडच्या अॅसेट मॅनेजमेंट” कंपनीने नवीन NFO खरेदीसाठी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला असून त्याचे नाव कोटक मल्टीकॅप फंड असे आहे.

याची विक्री ८ सप्टेंबर पासून सुरु झाली असून २२ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. यामधील गुंतवणूक ही विशेषतः लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या समभागामध्ये गुंतविण्याचे उद्दिष्ट आहे.
आणि कंपनीने याला एक उत्कृष्ट प्रकारचा “त्रिवेणी संगम” आहे असे म्हटले आहे.

लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप मध्ये प्रत्येकी २५% रक्कम गुंतवली जाणार असून उर्वरित रक्कम “डायनॉमिक अलोकेशन” द्वारा गुंतवली जाणार आहे.
यामध्ये पैसे गुंतविणाऱ्या व्यक्तीला लार्ज कॅप द्वारे मिळणारी Stability, मिडकॅपची ग्रोथ आणि स्मॉलकॅप मधील ‘प्रॉमिसेस’ याद्वारे भरघोस वाढ मिळण्याची शक्यता आहे असे मॅनेजमेंटचे मत आहे.
ज्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील “विवाह, स्वप्नातील घर आणि आपली निवृत्ती” यासंबधी नियोजन करायचे असल्यास हा एक फंड चांगला परतावा देणारा फंड आहे असे आमचे मत आहे.
हर्षा उपाध्याय आणि देवेंद्र सिंगल या फंडाचे फंड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
प्रदीप जोशी – ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!