देशातील अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने  PSU bond plus 40/60 sdl index fund लॉन्च केला आहे. हा नवीन फंड १६ सप्टेंबर रोजी खुला झाला असून २७ सप्टेंबर रोजी बंद होईल. या फंडात कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.

ही टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्सह योजना आहे. याची मॅच्युरिटी सप्टेंबर २०२७ मध्ये होईल. ही योजना निफ्टी ५० पीएसयू बॉण्ड प्लस एसडीएल इंडेक्स बॉण्डमध्ये गुंतवणूक करेल. गुंतवणूकीचे प्रमाण ४०-६० च्या धर्तीवर असेल. म्हणजेच रकमेच्या ४०% सरकारी कंपन्यांच्या बॉण्डमध्ये आणि ६०% एसडीएलमध्ये गुंतवले जातील. पीएसयू म्हणजे सरकारी कंपन्यांचे जे बॉण्ड असतात त्यात गुंतवणूक केली जाईल. तर एसडीएल म्हणजे स्टेट डेव्हलपमेंट लोन होय.

या योजनेत ८ एएए प्रमाणित बॉण्ड असतील. हा एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असेल. यात शीर्ष २० स्टेट लोन डेव्हलपमेंटचा पोर्टफोलिओ असेल. हा एक ओपन एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड आहे. यात सरकारी कंपन्या आणि एसडीएलमधील गुंतवणुकीचा दर तिमाहीत आढावा घेतला जाईल. याबद्दल अधिक माहिती देताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे उत्पादन प्रमुख चिंतन हरिया यांनी सांगितले की ही योजना गुंतवणूकदारांना ८ सरकारी कंपन्यांचे बॉण्ड्स आणि २० एसडीएलमध्ये गुंतवणुकीची संधी देईल. हे एसडीएल राज्य सरकार आणि केंद्रशासित राज्यांचे असतील. निश्चित गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली योजना आहे.

अभिप्राय द्या!