जेएम फायनान्शियल समूहाची प्रमुख एनबीएफसी अंग असलेल्या जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेडने प्रत्येकी १००० रुपये दर्शनी मूल्याच्या  एनसीडीच्या सार्वजनिक विक्रीचा पहिला टप्पा (ट्रान्च – १) शुक्रवारी जाहीर केला. पहिल्या टप्प्यातील (ट्रान्च १) रोखे विक्री २३ सप्टेंबर २०२१ रोजी खुली होणार असून १४ ऑक्टोबर २०२१ * पर्यंत सुरू राहिल.

सुरक्षित अपरिवर्तनीय रोखे इश्यूसंदर्भात जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कम्पानी म्हणाले की, “जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्सने वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादन मिश्रणासह आपले स्थान मजबूत केले आहे आणि जोखीम संतुलित फायदेशीर वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने मजबूत रोकड तरलतेचे स्थिती राखली आहे. ही सार्वजनिक रोखे विक्री आम्हाला आमच्या कर्ज व्यवसायात विस्तारासाठी आणि गुंतवणूकदारांच्या मिश्रणात विविधता आणण्यास मदतकारक ठरेल. आमचे मजबूत ताळेबंद पत्रक, सशक्त भांडवली स्थिती, विविध व्यवसायांचा संच व धोरणात्मक ग्राहककेंद्रित दृष्टिकोन हा आम्हाला आमच्या भागधारकांसाठी शाश्वत मूल्य मिळवून देण्यास मदत करतात.”

या योजनेत प्रत्येकी १००० रुपये दर्शनी मूल्याचे सुरक्षित रोखे गुंतवणूकदारांना इश्यू केले जाणार आहेत. एकूण १५०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीतील, पहिल्या टप्प्यात (ट्रान्च १) मूळ १०० कोटी रुपये आकारमानाच्य या रोखे विक्रीत अतिरिक्त भरणा झाल्यास अधिक ४०० कोटी रुपये म्हणजेच एकूण ५०० कोटी रुपये उभारणे प्रस्तावित आहेत.

रोख्यांचा कालावधी हा ३९ महिने ते १०० महिन्यांदरम्यान असेल असे कंपनीने म्हटलं आहे. गुंतवणूकदारांसाठी किमान अर्ज दाखल करण्याची सर्व मालिकांसाठी एकत्रितपणे १०००० रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. रोख्यांचे वितरण हे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्त्वावर होईल, असेही कंपनीने माहिती पत्रकात म्हटलं आहे. गुंतवणूकदार या एनसीडी विक्रीमध्ये केवळ डिमटेरियलाइज्ड स्वरूपात सहभाग घेऊ शकतील. हे एनसीडी विक्रीपश्चात मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचिबद्धतेसाठी प्रस्तावित असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

अभिप्राय द्या!