व्यवस्थित पद्धतीने आपला पैशांचे नियोजन केले, तर भविष्यातील सर्व धोक्यांपासून स्वतःचा बचाव करणे शक्य आहे, हेच आजच्या जगातील सूत्र आहे.
बचतीची आवश्यकता का?
प्रत्येकालाच संपत्ती जमविण्याची इच्छा असली, तरी प्रत्यक्षात पैशाला अनेक पाय फुटत राहतात. कोणतीही वस्तू, जी आपण आपल्या सोयीसाठी, वापरासाठी अथवा आरामासाठी विकत घेतो, त्या वस्तूमुळे आपल्या पैशांचे मूल्य कमी होत असते. जी गाडी आपण सकाळी नव्या शोरूममधून विकत घेतो, ती गाडी त्याच दिवशी संध्याकाळी त्याच शोरूममध्ये विकायला गेलो असता गाडीची किंमत काही हजार रुपयांनी नक्कीच कमी झालेली असते. आपण खर्च करत असलेल्या पैशाचे मूल्य अशाच पद्धतीने कमी होताना आपण पाहत असतो. यामुळेच बचत करणे महत्त्वाचे आहे. केवळ बचत न करता आपल्या पैशांची क्रयशक्ती टिकवून ठेवणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
दर महिन्याला आपल्या हातात मिळणारा पैसा आणि आपल्याला हवा असणारा पैसा यात नेहमीच तफावत असते. त्यामुळेच आपल्या गरजा आणि इच्छा यामध्ये समतोल साधत त्या पूर्ण करता याव्यात यासाठी बचत करणे आवश्यक आहे.
यासाठी ठोस उद्दिष्ट का हवे?
आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हे खूप आवश्यक आहे. युवापिढी नेहमीच सामाजिक आणि आर्थिक दबावांखाली असते. लग्न, गृहकर्ज, वाहनकर्ज, कुटुंबासाठीचा खर्च असे अनेक प्रकारचे खर्च असतात आणि याबरोबरच करमणूक आणि मौजमजाही साधायची असते.
नोकरीमधील सुरक्षितता नसणे हेदेखील तणावाचे एक मोठे कारण आहे.
आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला पैशांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, तरुणपणी नव्या घरच्या डाउन पेमेंटसाठी, त्यानंतर मुलांच्या शिक्षण, लग्नासाठी, विविध आजार-उपचारांसाठी त्या त्या वेळी पैसे उपलब्ध असणे महत्वाचे असते. पैशांचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्यास या खर्चांचा भार निवृत्तीसाठीच्या पूंजीवर पडतो.
खाजगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी तर निवृत्ती वेतनाचा पर्यायच उपलब्ध नाही, पण आता सरकारी क्षेत्रातील निवृत्ती वेतन मिळण्याचा काळही मागे पडल्याने निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैशांचे नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे.व या सर्वासाठी कोणत्या SIP कश्या करावयाच्या यासाठी अर्थसल्लागर गह्थावा हेच हिताचे !!