बँक ग्राहकांनो ही बातमी तुमच्यासाठी.
देशातील प्रमुख बँकांपैकी तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड पुढील महिन्याच्या १ तारखेपासून इतिहासजमा होणार आहेत.
या तीन बँकामध्ये अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या तीन बँका आता इतर बँकांचा भाग होणार आहेत. अलाहाबाद बँक १ एप्रिल २०२० रोजी इंडियन बँकेत विलीन झाली आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया १ एप्रिल २०१९ पासून पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलीन झाल्या आहेत.