aditya birla sunlife AMC समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून २९ सप्टेंबर २०२१ रोजी आपली इनिशियल पब्लिक ऑफरिंग खुली करणार आहे. या ऑफरचा प्राइज बँड प्रती समभाग ६९५ रूपये ते ७१२ दरम्यान ठरवण्यात आला आहे. बिड लॉट २० समभाग आहे आणि त्यानंतर २० समभागांच्या प्रमाणात आहे. समभाग विक्रीतून कंपनी २७६८.२५ कोटींचा निधी उभारणार आहे.

क्रिसिल रिपोर्टनुसार क्यूएएयूमकडून ३१ मार्च २०१८ पासून भारतातील सर्वांत मोठी बिगर बँक जोडलेली एएमसी म्हणून दर्जा प्राप्त आहे आणि ती ३० सप्टेंबर २०११ पासून क्यूएएयूएमकडून चार सर्वांत मोठ्या एएमसीपैकी एक म्हणून गणण्यात आली आहे. या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या प्रत्येकी ५ रूपये दर्शनी मूल्याच्या ३८,८८०,००० समभागांचा (समभाग) समावेश विक्रीच्या ऑफरद्वारे आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या (एबीसीएल) २,८५०,८८० समभागांचा आणि सनलाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट आयएनसी.च्या ३६,०२९,१२० समभागांचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!