ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आयपीओचा पूर येणार आहे. सुमारे ३५ कंपन्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ८०,००० कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहेत. यामध्ये पेटीएम, आधार हाऊसिंग फायनान्स, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, पॉलिसीबाजार आणि अदानी विल्मर सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

१४ कंपन्यांना मिळाली मंजुरी
१४ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये परदीप फॉस्फेट्स, गो एअरलाइन्स, रुची सोया इंडस्ट्रीज, आरोहन फायनान्शिअल सर्व्हिसेस, उत्कर्ष स्मॉल फायनान्स आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स यांचा समावेश आहे. या कंपन्या सुमारे २२,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. ६४ कंपन्यांनी आयपीओ  साठी सेबीकडे DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स) दाखल केले आहेत. पॉलिसीबझार आणि नायकाचे आयपीओ या महिन्यात अपेक्षित आहेत. त्यांचा आकार अनुक्रमे ६,००० कोटी आणि ४,००० कोटी रुपये असू शकतो. चेन्नईस्थित स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थचा ७,००० कोटी रुपयांचा आयपीओ या वर्षाच्या अखेरीस येऊ शकतो.

मोबिक्विक, परदीप फॉस्फेट्स, सीएमएस इन्फोसिस्टम्स, नॉर्दर्न आर्क, सफायर फूड्स आणि टार्सन्स प्रॉडक्ट्सचे ऑक्टोबरमध्ये आयपीओ येऊ शकतात, तर डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमचा बहुप्रतिक्षित आयपीओ नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो. चीनची अँट ग्रुप आणि जपानची सॉफ्टबँक यांच्या गुंतवणुकीसह घरगुती फिनटेक फर्म पेटीएमने १६,६०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अर्ज केला आहे. हा आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे. त्याला अद्याप नियामक मान्यता मिळणे बाकी आहे.

अभिप्राय द्या!