भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या म्युच्युअल फंड नियम १९९६ च्या कलम २९ ए च्या परिशिष्ट ४ नुसार म्युच्युअल फंडांना किरकोळ गुंतवणूकदारांपुढे नामनिर्देशनचा पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन (नॉमिनेशन) ही अशी सुविधा आहे ज्याने वैयक्तिक युनिटधारकाला आपला नॉमिनी (वारसदार) नियुक्त करता येतो. जो युनिटधारकाचा अचानक मृत्यू झाला तर युनिटधारकाकडील युनिटची विक्री करणे किंवा गुंतवणूक पैसे काढून घेण्याचा दावा करू शकतो.

करोना संकटाने पुन्हा गुंतवणूकदारांच्या नामनिर्देशनाचे (इन्व्हेस्टर नॉमिनेशन) गंभीर मुद्दयाला महत्व आले आहे. या संकटकाळात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना (जे युनिटहोल्डर्स) गमावले अशाना युनिट्सबाबत संघर्ष करावा लागत आहे. ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी अॅम्फीने ज्या ठिकाणी नॉमिनी नाही अशा वैयक्तिक युनिटधारकाचे मृत्युपश्चात युनिट हस्तांतर करण्याची किंवा क्लेम करण्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया ही नेहमीच लांबलचक, अवघड आणि वेळखाऊ असते. नॉमिनेशनमुळे ही प्रक्रिया टाळता येईल आणि गुंतवणूक तसेच हस्तांतर आणखी सोपी होऊन जाईल.

सेबी आणि अॅम्फी यांनी ज्या गुंतवणूकदारांनी नॉमिनेशन केलेलं नाही, अशांना त्याचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक उपायोजना केल्या आहेत. इतके प्रयत्न करून देखील आजच्या घडीला नॉमिनी नसलेल्या फाॅलिओंची संख्या एकूण फाॅलिओंच्या तुलनेत जवळपास २० ते २५ टक्के आहे.

अभिप्राय द्या!