देशातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये बुधवारी (१३ ऑक्टोबर) १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाजगी इक्विटी फर्म टीपीजी ग्रुप टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीमध्ये १ अब्ज डॉलर किंवा ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या बातमीमुळे, टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी वाढून ४९८.८५ रुपयांवर पोहोचला असून तो ५२ आठवड्यांचा उच्चांकही ठरला आहे.

टाटा मोटर्सने २०२५ पर्यंत देशात १० नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

अभिप्राय द्या!