दक्षिण भारतात चांगला जम बसविलेली बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) इंडेल मनी, loan and equity  यांच्या संयोगातून ८०० ते १००० कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीच्या अपरिवर्तनीय रोख्यांनी (एनसीडी) ‘क्रिसिल बीबीबी/स्टेबल’ असे मानांकन प्राप्त केले असून, पहिल्या टप्प्यांतील १५० कोटी रुपयांची रोखे जारी करून कंपनी चालू वर्षात सप्टेंबरमध्ये बाजारात दाखल होणार आहेत.

कंपनी ५०० कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीद्वारे विविध टप्प्यांमध्ये कर्ज उभारेल. मार्केट-लिंक्ड डिबेंचर, पास-थ्रू सर्टिफिकेट्स (पीटीसी) आणि डायरेक्ट असाइनमेंट्स यासारखी अन्य कर्ज साधने जारी करून कंपनी १५० ते २०० कोटी रुपये उभारेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जाद्वारे आणखी १०० ते १५० कोटी रुपये उभारले जातील.

अभिप्राय द्या!