भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आपल्या पहिल्या खाजगी पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट च्या माध्यमातून पाच ते सहा हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. या गुंतवणूकदारांमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB) आणि ओंटारियो म्युनिसिपल एम्प्लॉइज रिटायरमेंट सिस्टम (OMERS) यांचा समावेश आहे. इन्व्हिटद्वारे (InvIT) सरकारी मालकीच्या उपक्रमाद्वारे मालमत्ता कमाईची ही पहिली वेळ असेल.

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) म्युच्युअल फंडाप्रमाणे असतात. ज्याद्वारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करून परताव्याच्या स्वरूपात उत्पन्नाचा एक छोटा हिस्सा मिळवू शकतात. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारखे काम करतात.

InvIT ट्रस्ट म्हणून स्थापिक केली जाऊ शकतात आणि सेबीकडे नोंदणीही केली जाऊ शकते. InvITमध्ये चार गोष्टींचा समावेश होतो : १) विश्वस्त (ट्रस्टी) २) प्रायोजक ३) गुंतवणूक व्यवस्थापक ४) प्रकल्प व्यवस्थापक.

इन्व्हिट (InvIT) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सना दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस) पडलेल्या भांडवलाचा पुनर्वापर करण्यास मदत करतात. या प्रकल्पांमध्ये रस्ते, ट्रान्समिशन लाइन किंवा नूतनीकरणयोग्य मालमत्तांचा समावेश आहे. इक्विटी व्यतिरिक्त InvITs दीर्घकालीन कर्ज वाढवण्यास मदत करतात.

अभिप्राय द्या!