डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने (डीएसपीआयएम) डीएसपी इंडिया टीआयजीईआर (द इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ अँड इकोनॉमिक रिफॉर्म फंडाचा) ओल्ड फंड ऑफरिंग अर्थात ओएफओ जाहीर केला आहे. आर्थिक चक्र व आर्थिक सुधारणांतून होणाऱ्या वाढीच्या पुनरुज्जीवनाचालाभ घेण्याच्या गुंतवणूकदारांना मिळालेल्या संधी वर प्रकाश टाकण्यासाठी ओएफओ जाहीर करण्यात आला आहे.

डीएसपीआयएमच्या मते, गुंतवणूक चक्रतळाला गेले आहे आणि आता या चक्राला वर जाण्यासाठी आवश्यकते सर्व घटकउपस्थित आहेत. यामुळे खर्चाची दृश्यमानता ३-५वर्षे टिकणार आहे. अनुकूल ढोबळ अर्थशास्त्र व महत्त्वाच्या सुधारणांची अंमलबजावणी यांमुळे बाजाराचे महत्त्वाचे आधारस्तंभ स्थिर राहणे अपेक्षित आहे. म्हणूनच संरचना क्षेत्रातील गुंतवणूक देशाच्या जीडीपीला चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

सरकारी, खासगी व रिअल इस्टेट या तीन क्षेत्रांतील महत्त्वाच्या विभागां वरील खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय संरचनेवर भर देणाऱ्या सरकारच्या उपक्रमांमुळे रस्ते, रेल्वे, पाणी व विमानतळ यांसारख्या क्षेत्रांवरील खर्च पुढील काही वर्षे वाढणार आहे. यामुळे सिमेंट, स्टील आणि अन्य भांडवली उपकरणां सारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाची मागणी वाढणार आहे व पर्यायाने खासगी क्षेत्रातील क्षमता उपयोजनाला चालना मिळेल आणि कॅपेक्सचे पुनरुज्जीवन होईल. सर्वांत कमी गहाण दर (मॉर्गेजरेट्स), मालमत्तेच्या स्थिर किंमती आणि कर समायोजित गहाण दर व भाड्यापोटी मिळणारे उत्पन्नयांच्यातील तफावत गेल्या अनेक दशकांशी तुलना करता सर्वांत कमी असणे या तीन घटकांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील रचनात्मक चालना मागणी चक्रासाठी पुढील अनेक वर्षे कायम राहील,असा अंदाज आहे.

अभिप्राय द्या!