आयटीआय म्युच्यूअल फंडाने iti pharma and healthcare fund  ही नवीन योजना बाजारात आणली आहे. या योजनेचा एनएफओ १८ ऑक्टोबर २०२१ ला खुला झालेला असून १ नोव्हेंबर २०२१ ला बंद होत आहे. या योजनेत किमान गुंतवणूक पाच हजार रुपयांची असून त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाचे व्यवस्थापन प्रदीप गोखले आणि रोहन कोरडे हे संयुक्तपणे सांभाळणार आहेत. फंडातील निधी फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतविला जाणार असून निफ्टी हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स या फंडासाठी पायाभूत निर्देशांक राहणार आहे.

आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत समाधानाचा अनुभव मिळण्यासाठी अतिशय छोट्या कालावधीत समुहाने आपल्या एएमसीत उच्च कारभार, मनुष्यबळ, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा याबाबत उत्तम मापदंड तयार केले आहेत. या फंडाच्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या एकुण निधीने (एयुएम) ऑगस्ट २०२१ अखेरीस तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. फंडाकडे ३१ ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत असलेल्या दोन हजार ३४ कोटी रुपयांपैकी समभाग विभागात तब्बल एक हजार ४६० कोटी रुपयांचे संकलन झालेले आहे, तर हायब्रीड आणि डेट विभागातील योजनांद्वारे अनुक्रमे २३० कोटी आणि ३४४ कोटी रुपये संकलित झालेले आहेत.

आयटीआय fund  एप्रिल २०१९ मध्ये कार्यान्वित झालेला असून आत्तापर्यंत या फंडाने गुंतवणूकदारांसाठी तेरा प्रमुख फंड योजना बाजारात आणलेल्या आहेत. या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला ( एएमसी) रोख निधीच्या बाबतीत अतिशय सक्षम अशा उद्योगसमुहाचे पाठबळ आहे

अभिप्राय द्या!