आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाने निफ्टी आयटी ईटीएफ ही NFO जाहीर केली आहे. हा एक ओपन एंडेड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे. हा निफ्टी आयटी टीआरआय (टोटल रिटर्न इंडेक्स) ट्रॅक करेल. हा फंड २० ऑक्टोबर रोजी खुला झाला असून २८ ऑक्टोबर रोजी बंद होईल. या एनएफओमध्ये किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येऊ शकते.
निफ्टी आयटी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) निर्देशांक मुक्त फ्लोट बाजार भांडवल पद्धतीचा अवलंब करतो. हा निर्देशांक भारतीय आयटी क्षेत्राचा बेंचमार्क म्हणून काम करतो. यात १० आयटी कंपन्यांचा समावेश असतो. या सर्व या सर्व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर सूचीबद्ध कंपन्या आहेत. हा प्रामुख्याने लार्ज कॅप इंडेक्स आहे जो तिमाही आधारावर पुनर्संतुलन (रिबॅलन्सिंग) राखतो.
यात कोणताही स्टॉक ३३% हून अधिक नसतो. पुनर्संतुलनाच्या वेळी शीर्ष ३ स्टॉकचे मूल्य एकत्रितरित्या ६२% हून अधिक नसते. निफ्टी आयटी इंडेक्सने विविध परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ ए. बालसुब्रमणियन यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत भारताने स्वतःला आयटी आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन सेवांसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून स्थापित केले आहे. भारतात या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे एफडीआयचे प्रमाण ४४% राहिले आहे.