केएफसी आणि पिझा हट या फूड चेन ऑपरेट करणाऱ्या सफायर फूड्सकडून प्राथमिक बाजारात समभाग विक्री करून २०७३ कोटी उभारले जाणार आहेत. सफायर फूड्सचे भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये ४३७ रेस्तरॉं आहेत. आयपीओ ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी खुला होणार आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी बंद होईल. या प्रस्तावासाठी दरश्रेणी प्रति इक्विटी समभाग १,१२० रुपये ते १,१८० रुपये यांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. किमान १२ इक्विटी समभाग आणि त्यानंतर १२च्या पटीतील इक्विटी समभागांसाठी बोली लावली जाऊ शकेल.
प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावामध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १७,५६९,९४१ इक्विटी समभागांच्या (“इक्विटी शेअर्स”) विक्रीचा प्रस्ताव आहे. यात क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्टचे ८५०,००० इक्विटी शेअर्स, सफायर फूड्स मॉरिशस लिमिटेडचे (क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्टसोबत “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) ५,५६९,५३३ डब्ल्यूडब्ल्यूडी रुबी लिमिटेडचे ४,८४६,७०६ इक्विटी समभाग, अॅमिथिस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ३,९६१,७३७ इक्विटी समभाग, एएजेव्ही इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे ८०,१६९ इक्विटी समभाग, एडलवाइज क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंड्सचे १,६१५,५६९ इक्विटी समभाग, एडलवाइज क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंड- सीरिज टूमधील ६४६,२२७ फंड्स यांचा समावेश आहे.