देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची प्रवर्तक (प्रमोटर) वन ९७ कम्युनिकेशन्सचा १८,३०० कोटी रुपयांचा महा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक फायदेशीर ठरेल की नाही, याबाबत विश्लेषकांमध्ये मतभिन्नता आहे. काही विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेनसाठी हा आयपीओ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
या आयपीओ (IPO) मध्ये ८,३०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आहेत, तर प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक १०,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. कंपनीने आयपीओसाठी २०८०-२१५० रुपये प्राईस बँड ठेवली आहे. कंपनीने आयपीओच्या आधी गेल्या आठवड्यात १२२ अँकर गुंतवणूकदारांकडून ८२३५ कोटी रुपये उभारले आहेत.