आजपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात बाजारात तीन कंपन्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) येत आहेत. यातून जवळपास २१ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे. या आठवड्यात पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ (One 97) कम्युनिकेशन्स, केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) रेस्टॉरंट्स चालवणारी सफायर फूड्स इंडिया लिमिटेड आणि लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सचे आयपीओ येत आहेत. पेटीएमचा आयपीओ आज ८ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला झाला. सॅफायर फूड्स आणि लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सचे आयपीओ ९ आणि १० नोव्हेंबर २०२१ रोजी खुले होती.

दिवाळीच्या आठवड्यातही विविध क्षेत्रातील ५ कंपन्यांचे आयपीओ यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. यामध्ये सौंदर्य आणि वेलनेस उत्पादनांसाठीच्या ऑनलाइन मार्केटप्लेस नायकाचे परिचालन करणाऱ्या एफएसएन (FSN),पॉलिसी बाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेक (PB Fintech), फिनो पेमेंट्स (Fino Payments), एसजेएस एंटरप्रायझेस (SJS Enterprises) आणि सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries) यांचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!