पेटीएम च्या १८,३०० कोटी रुपयांच्या आयपीओला बुधवारी (१० नोव्हेंबर) इश्यूच्या शेवटच्या दिवशी १.८९ पट सबस्क्रिप्शन मिळाले. पेटीएमचा आयपीओ ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी शेअर विक्री ठरली आहे. यामुळे पेटीएम देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे. स्टॉक एक्सचेंजकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (One97 Communications Limited) च्या आयपीओ (IPO)ला ४.८३ कोटी शेअर्सच्या ऑफरवर एकूण ९.१४ कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली आहे.
- Post published:November 11, 2021
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments