Axis Mutual Fund या आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने अॅक्सिस निफ्टी ५० इंडेक्स फंडाची घोषणा केली. ही एक ओपन-एंडेड योजना आहे, ज्यातून निफ्टी-५० इंडेक्स ट्रायचा पाठपुरावा केला जाईल आणि गुंतवणूकदारांना मोठ्या कॅप क्षेत्रात सहभागी होण्याची संधी दिली जाईल. एनएफओ १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे आणि २९ नोव्हेंबर २०२१ रोजी बंद होईल.

अॅक्सिस निफ्टी ५० इंडेक्स फंडचे व्यवस्थापन इक्विटी प्रमुख जिनेश गोपानी यांच्याकडून केले जाईल. अर्जाची किमान रक्कम ५,००० रूपये असून गुंतवणूकदारांना त्यानंतर १ रूपयांच्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल. या फंडच्या सहशील धोरणाद्वारे निफ्टी ५० इंडेक्समधील १३ वर्गवारींमध्ये त्यांच्या असलेल्या प्रमाणात गुंतवणूक करून निफ्टी ५० इंडेक्सच्या प्रतिकृतीद्वारे काम केले जाईल.

अभिप्राय द्या!