मी नुकतीच एक चांगली तुलना केली आहे, जी शिशू आणि बाजारातील शेअरचे मूल्य आणि म्युच्युअल फंडाचे युनिट यांच्यात तुलना करते, कसे ते समजून घेऊया :
प्रश्‍न

1) जन्मल्याजन्मल्या बाळाने रांगले पाहिजे अशी अपेक्षा आपण करतो का?
– याचे उत्तर “नाही’ असे आहे, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे आपण नव्यानेच सुरू केलेल्या शेअरखरेदी किंवा म्युच्युअल फंडाच्या “एसआयपी’ गुंतवणुकीतून पहिल्या दिवसापासूनच मोठ्या परताव्याची अपेक्षा करू नये.

2) जेव्हा लहान मूल रडते, तेव्हा तुम्ही काय करता?
– जेव्हा मूल रडते, तेव्हा आई त्याला भरवते आणि शांत करते. याचप्रमाणे जेव्हा “सेन्सेक्‍स’ आणि “निफ्टी’ पडतात (रडतात), शेअरचे भाव गडगडतात; तेव्हा आपण त्यांना संयमाने आणखी पैसे दिले पाहिजेत, म्हणजेच आपल्या गुंतवणुकीला वेळ आणि बळ दिले पाहिजे, कारण यामुळे ते हळूहळू वाढत राहतात.

शेवटी, संपूर्ण जगातील शेअर बाजारात अजून तरी काही दिवस कठीण परीक्षेचा काळ आहे. पण मला असे निश्‍चित वाटते, की हीच पैसे कमावण्याची संधी आहे आणि आपण सध्याच्या या परिस्थितीचा फायदा करून घेतला पाहिजे.

अभिप्राय द्या!